आता ‘मिस मास्की’ची सॅनिटायझर, मास्क वापरावर नजर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:45+5:302021-08-28T04:36:45+5:30

उस्मानाबाद -काेराेनाचे संकट अद्याप टळलेले नाही. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचे भाकीत केले जात आहे. अशा संकटाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी मास्क, ...

Now look at Miss Musky's sanitizer, mask use ... | आता ‘मिस मास्की’ची सॅनिटायझर, मास्क वापरावर नजर...

आता ‘मिस मास्की’ची सॅनिटायझर, मास्क वापरावर नजर...

googlenewsNext

उस्मानाबाद -काेराेनाचे संकट अद्याप टळलेले नाही. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचे भाकीत केले जात आहे. अशा संकटाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. असे असतानाही अनेकजण याकडे डाेळेझाक करीत आहेत. एखाद्या व्यक्तीने मास्क घातला आहे की नाही हे तपासून सूचना करेल, असा राेबाेट तेरणा अभियांत्रिकी काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. ताे नुकताच कार्यान्वितही करण्यात आला आहे. या राेबाेटचे नाव ‘मिस मास्की’ असे ठेवण्यात आले आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्याने मानवाची संपूर्ण जीवनशैलीच बदलून गेली. अनेक काेराेना रुग्णांकडे त्यांच्या नातेवाइकांनी पाठ फिरविली. एवढे विदारक चित्र समाजात पाहायला मिळाले. प्रत्येक वेळा मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि त्याचा वापर होतोय का नाही हे पाहणे, हीच एक जटिल समस्या बनली. कारण जो-तो या छोट्याशा विषाणूने घाबरला होता. यालाच पर्याय म्हणून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय व त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून चक्क काम करणारा ‘मिस मास्की’ या सुंदर नावाने राेबाेट नुकताच तयार केला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या परिश्रमाचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, सद्य:परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट आमच्या विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तत्काळ सूचना करतो, तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंदसुद्धा आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो, तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागतसुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयात फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. जी. शिंदे, प्रोजेक्ट समन्वयक प्रा. श्रीकांत अघोर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. पवनकुमार पाईकराव, व्ही. डी. पवार, सचिन शेळवणे, प्रकाश महाजन आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Now look at Miss Musky's sanitizer, mask use ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.