मुरूममधील बाधितांची संख्या पोहोचली २४२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:24 AM2021-05-31T04:24:12+5:302021-05-31T04:24:12+5:30
मुरूम : शहरातील ग्रामीण रुग्णालयात मागील तीन दिवसात झालेल्या रॅपिड अँटिजन चाचणीत शहरातील बाधितांची संख्या आठने वाढून २४२वर पोहोचली ...
मुरूम : शहरातील ग्रामीण रुग्णालयात मागील तीन दिवसात झालेल्या रॅपिड अँटिजन चाचणीत शहरातील बाधितांची संख्या आठने वाढून २४२वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ५२ जणांवर उपचार सुरू होते, तर उपचारानंतर बरे झालेल्या चार जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
शुक्रवारी शहरातील ग्रामीण रुग्णालयात ११ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील नेहरूनगर, सुभाष चौक या भागात चार रुग्ण नव्याने आढळून आले. याशिवाय चौघा संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी ग्रामीण रुग्णालयात शहर व परिसरातील ४५ जणांची चाचणी झाली. यात सुंदरवाडी व बेळंब येथील प्रत्येकी एक असे दोघे बाधित निघाले. यानंतर शनिवारी शहरात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. मात्र रविवारी पुन्हा चार नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण रुग्णालयात १५ रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आल्या. यामध्ये शहरातील चार, तर ग्रामीण भागातील तीन अशा सात रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील संभाजीनगर येथील चार, तुळजापूर तालुक्यातील मड्डी सलगरा येथील दोन, तर बेळंब येथे एक अशा सात रुग्णांचा समावेश आहे. चाचण्यांची संख्या कमी असतानाही १५ पैकी सात म्हणजेच चाचणीच्या जवळपास ४५ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.