पोषण पंधरवडा अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 AM2021-03-18T04:32:22+5:302021-03-18T04:32:22+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अंगणवाडी क्र. ९०९ मध्ये पोषण पंधरवाडा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अंतर्गत पूरक ...
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अंगणवाडी क्र. ९०९ मध्ये पोषण पंधरवाडा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अंतर्गत पूरक आहार, आरोग्य, पोषणाबाबत रॅली, गृहभेटी, वृक्षारोपण करून, दररोज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जाणीव जागृती व समाजप्रबोधन करण्याचे सुरू आहे. या अभियानाचे उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा विशाखा समितीच्या जिल्हाध्यक्ष बाबई चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी अणदूर बिटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका एस.एस. खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी परिसरात आवळा, जांभूळ या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यासाठी वैजयंता बोंगरगे, लक्ष्मी मुकरे यांच्यासह अणदूर येथील अंगणवाडी कर्मचारी व सेविकांनी पुढाकार घेतला.
फोटो- अणदूर येथे पोषण पंधरवाडा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाबई चव्हाण, एस.एस. खरात व अंगणवाडी कर्मचारी.