क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:37 AM2021-08-14T04:37:43+5:302021-08-14T04:37:43+5:30
७१३ जिल्ह्यातील क्षयरोगी ५०० रुपये भत्ता किती जणांना मिळतो ५६ आजार व भत्ता मिळणाऱ्यांचे प्रमाण टीबीची लक्षणे १५ दिवसांपेक्षा ...
७१३
जिल्ह्यातील क्षयरोगी
५००
रुपये भत्ता किती जणांना मिळतो
५६
आजार व भत्ता मिळणाऱ्यांचे प्रमाण
टीबीची लक्षणे
१५ दिवसांपेक्षा जास्त बेडकायुक्त खोकला.
हलकासा व रात्री येणारा ताप.
वजन कमी होणे,
भूक कमी होणे,
बेडक्यातून रक्त येणे,
छातीत दुखणे,
जास्तीतजास्त २४ महिन्यांपर्यंत टीबीमुक्त
टीबीचे लक्षणे आढळून येतातच, त्याचे निदान झाले, तर औषधोपचाराने ६ महिन्यांत टीबी पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार न घेतल्यास तो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्याकरिता १८ ते २४ महिने औषधोपचार घ्यावे लागतात. यातून रुग्ण बरा होतो.
१५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, ताप, खोकल्यातून रक्त पडणे अशी लक्षणे आढळून आली, तर नजीकच्या रुग्णालयात थुंकी तपासणी किंवा एक्सरे काढून घेणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांनाही टीबीच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डॉ.रफीक अन्सारी, क्षयरोग अधिकारी.