‘आराेग्य’च्या पाेर्टलमध्ये अडथळेच अडथळे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:01+5:302021-08-22T04:35:01+5:30
काेराेनाच्या संकटामुळे आराेग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची गरज समाेर आली. काही महिन्यांपूर्वीच शासनाने रिक्त जागा भरण्यासाठी घाेषणा केली हाेती. ...
काेराेनाच्या संकटामुळे आराेग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची गरज समाेर आली. काही महिन्यांपूर्वीच शासनाने रिक्त जागा भरण्यासाठी घाेषणा केली हाेती. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या. यानंतर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पाेर्टल उपलब्ध करून देण्यात आले. परंतु, हे पाेर्टल अनेक त्रुटींनी ग्रासले आहे. याचा नाहक मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. अशाच त्रस्त झालेल्या काहींनी थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्रुटींचा पाढा वाचला. एवढेच नाही, तर त्यांच्या मार्फत राज्याच्या आराेग्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्रुटींचा पाढाच वाचला आहे. काही उमेदवार अर्ज करण्यासाठी गेल्यानंतर काही काळ तर लाॅगीनच हाेत नाही. महत प्रयत्नानंतर लाॅगीन झाल्यास काही पदांची नावे स्क्रीनवर दिसत नाहीत. यामध्ये संबंधित उमेदवारांचा प्रचंड वेळ वाया जाताे आहे. काही वेळा तर लाॅगीन झाल्यानंतरही अर्ज पुढे जात नाही. कधी-कधी अर्ज पुढे गेला तर एखादा टॅब निघून जाताे. तर काही वेळा नवीन टॅब येताे. एकूणच पाेर्टलच्या या गाेंधळामुळे परीक्षेपूर्वीच अनेक उमेदवार बेजार झाले आहेत. पाेर्टलमधील सदरील त्रुटी दूर न केल्यास इच्छा असतानाही अनेक जण अर्ज करू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाने या बाबतीत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी उमेदवारांतून हाेत आहे.
चाैकट...
जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतली धाव...
पाेर्टलमधील अडथळ्यांची शर्यत काही केल्या दूर हाेत नसल्याने संतप्त झालेल्या भीमनिर्णायक युवाच्या पदाधिकाऱ्यांसह काही उमेदवारांनी थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन उपराेक्त प्रश्न त्यांच्यासमाेर मांडला. अडथळे दूर न झाल्यास अनेक जण अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शासनाने तातडीने त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष सिचन दिलपाक, जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, गाैतम बनसाेडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे, सिद्धार्थ बनसाेडे, सूरज सुरते आदींची उपस्थिती हाेती.