लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:02+5:302021-06-11T04:23:02+5:30

भूम येथील सुबाबाई माने या ६५ वर्षीय महिलेवर भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना ...

Obstruction of the duty of public servant, filing a case. ” | लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल.”

googlenewsNext

भूम येथील सुबाबाई माने या ६५ वर्षीय महिलेवर भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ८ जूनला उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले; परंतु, सुबाबाई यांचे नातू नाना माने याने यांनी तेथे येऊन ‘तुम्ही आमचे पेशंट आजीस मारता काय, मी तुम्हाला कोयत्याने कापतो?” असे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदर्श दासरे यांना धमकावत धक्काबुक्की केली तसेच रुग्णालयातील सहकारी डॉ. भगवान गोपाळघरे यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदर्श दासरे यांनी भूम ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

Web Title: Obstruction of the duty of public servant, filing a case. ”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.