उस्मानाबादेत अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:31 PM2018-09-11T17:31:14+5:302018-09-11T17:33:36+5:30
अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काटी येथील एका बोगस डॉक्टरविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद : अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काटी येथील एका बोगस डॉक्टरविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे़
आरोग्य विभागाच्या वतीने तुळजापूर तालुका व परिसरात बोगस डॉक्टर तपासणी मोहीम राबविण्यात येते. आरोग्य विभागाच्या पथकाने काटी येथील डॉ़ शोनावात उर्फ सनातन विष्णूदास यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली होती़ तपासणीनंतर डॉ़ शोनावात विष्णूदास यांच्याकडे मेडीकल कौन्सिलचा परवाना नसल्याचे समोर आले होते़ यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ आरिफ अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ़ शोनावात विष्णूदास विरूध्द सोमवारी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि अफरोज पठाण हे करीत आहेत़