नवीन तलावांसह जुन्यांचीही होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:21+5:302021-03-16T04:32:21+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील नवीन तलावांच्या कामासाठी १२ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दुरुस्तीच्या कामासाठीदेखील २ ...
उस्मानाबाद : उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील नवीन तलावांच्या कामासाठी १२ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दुरुस्तीच्या कामासाठीदेखील २ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात येत आहे. त्याची दखल घेत महाविकास आघाडीच्या सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन कामासाठी कळंब तालुक्यात ११ कोटी ४ लाख, तर मतदारसंघातील उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी १ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी एक लाख रुपये व कळंब तालुक्यातील गावांसाठी १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नवीन कामामध्ये कळंब तालुक्यातील मोहा, मंगरूळ, शेळका धानोरा, सौंदणा (ढोकी), भाटशिरपुरा, देवधानोरा, बोरवंटी, वाठवडा, नायगाव, खामसवाडी, आथर्डी, भाटसांगवी, ईटकूर, खडकी, सात्रा, वाकडी, बोरगाव (ध), या गावातील गेटेड चेकडॅमचा समावेश आहे. याशिवाय उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा, दूधगाव, तडवळा येथील गेटेड चेकडॅम कामांचा समावेश आहे.
या तालावांची होणार दुरुस्ती
दुरुस्तीच्या कामामध्ये कळंब तालुक्यातील आढाळा, ईटकूर, ताडगाव, नायगाव, मस्सा (खं), सौंदणा (अंबा), पाडोळी, वडगाव (नि), वडगाव (जा), बोरगाव (बु), आवाडशिरपुरा, एकुरगा, गौरगाव, पिंपरी, रांजणी, उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, पळसप, गोपाळवाडी, कुमाळवाडी, उस्मानाबाद, राघुचीवाडी, येडशी (सुळकी) व वाखरवाडी, आदी गावांतील पाझर तलावांचा समावेश आहे.