खुदावाडी शेतकरी वाचनालयास दीड लाखांची पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:04+5:302021-08-14T04:38:04+5:30

अणदूर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावातील रहिवासी रचना कन्स्ट्रक्शनचे चेअरमन यांनी खुदावाडी येथील शेतकरी वाचनालयास सुमारे दीड लाखांची पुस्तके भेट ...

One and a half lakh books donated to Khudawadi Farmers Library | खुदावाडी शेतकरी वाचनालयास दीड लाखांची पुस्तके भेट

खुदावाडी शेतकरी वाचनालयास दीड लाखांची पुस्तके भेट

googlenewsNext

अणदूर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावातील रहिवासी रचना कन्स्ट्रक्शनचे चेअरमन यांनी खुदावाडी येथील शेतकरी वाचनालयास सुमारे दीड लाखांची पुस्तके भेट दिली. त्यांच्या या अनाेख्या दातृत्वाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

खुदावाडी येथील शेतकरी वाचनालयाची स्थापना १९७५ साली करण्यात आली आहे. कै. तुकाराम बापू नरवडे, डॉ. सिद्रमाप्पा खजूरे, बाब्रुवान नरवडे, वसंत चिंचोले, वसंत सालगे यांच्या मार्गदर्शनाखाली या वाचनालयाची निर्मिती झाली आहे तेव्हापासून ते आजतागायत हे वाचनालय अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे. वाचनालयात सध्या १५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त पुस्तके आहेत. साेबतच मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रेही ठवेली जातात. वाचनाची आवड लोकांमध्ये वाढावी, यासाठी रचना कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर सुजित मुळे यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खुदावाडी वाचनालयास दीड लाखांची पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी केले. कार्यक्रमास कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर अमोल नरवडे, उपसरपंच पांडुरंग बापू बोगरगे, माजी सरपंच रेवणसिद्ध स्वामी, माजी सरपंच गुरुनाथ कबाडे, माजी उपसरपंच अमर नरवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत कबाडे, शेतकरी वाचनालयाचे सचिव वसंत चिंचोले, अभियंता वैजनाथ बसूदे, कोषागार मॅनेजर महेश व्हरकटे, योगेश हांजगे, श्रीधर नरवडे, अविनाश नरवडे, मोहन नरवडे, अनंत नरवडे, देवीदास बोंगरगे आदी उपस्थित हाेते.

Web Title: One and a half lakh books donated to Khudawadi Farmers Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.