कोरोनामुक्त दीड टक्के ज्येष्ठांना ‘फ्रायब्रोसिस’ जाणवतोय त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:28 AM2020-12-23T04:28:07+5:302020-12-23T04:28:07+5:30
जिल्ह्यात जून महिन्यापासून झपाट्याने रुग्ण वाढू लागले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांच ग्राफ वाढला होता. आऑक्टोबर महिन्यापासून बाधितांचा ...
जिल्ह्यात जून महिन्यापासून झपाट्याने रुग्ण वाढू लागले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांच ग्राफ वाढला होता. आऑक्टोबर महिन्यापासून बाधितांचा आकडा घटू लागला. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, कोरोनानंतर रुग्णांमध्ये नैराश्य, झोपेची कमतरता, रक्तात गुठळ्या तयार होणे, सांधेदुखी यांचीही भर पडत आहे. ‘फ्रायब्रोसिस’ श्वसनाचे इंन्फेक्शन मुख्यत्वे कारण म्हणजे उपचार उशिरा करणे असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. ५० वयोगटापुढील कोरोनामुक्त झालेला घरी गेल्यानंतर त्यास पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो. चालताना धाप लागते. वेळीच उपचार न केल्यास ‘फ्रायब्रोसिस’ मुळे फुफ्फुस निकामी होण्याचा धोकाही उदभवू शकतो. जिल्ह्यात सुमारे १५ हजारावर रुग्ण बरे झालेले आहेत. यातील दीड ते दोन टक्के रुग्ण ‘फ्रायब्रोसिस’ फुफ्फुसाचे इंन्फेक्शन झाल्याचे आढळून आले असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ५० वयोगटापुढील नागरिकांमध्ये ‘फ्रायब्रोसिस’ आढळून येत आहे. तरुणांना ‘फ्रायब्रोसिस’ त्रास जाणवू लागला आहे. दीड टक्के नागरिकांना ‘फ्रायब्रोसिस’ चा अधिक धोका आहे. कोराेनातून बरे झालेल्या नागरिकांनी सकस आहार, व्यायाम, योगासणे करणे गरजचे आहे.
डाॅ. तानाजी लाकाळ, जनरल फिजिशियन
कारोना मुक्त रुग्णांना पोस्ट काेविड सेंटर
कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना अन्य आजाराचे त्रास जाणवू लागले आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र पोस्ट कोविड सेंटर सुरु केले आहे. तपासणीनंतर ज्या रुग्णांना गंभीर त्रास आहे. त्यांना उपचारासाठी दाखल केले जात आहे. रुग्णांसाठी सोयु-सुविधायुक्त पोस्ट कोविड कक्ष कार्यान्वित केले आहे.
धाप लागणे, श्वास घेण्याचा त्रास
ज्या कोरोना रुग्णांमध्ये निमोनियाचे प्रमाण वाढले. त्या रुग्णांमध्ये ‘फ्रायब्रोसिस’चा त्रास अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. यात ५० वयोगटातील नागिरक आहेत. धाप लागणे, श्वास घेण्यास अडथळा अशा रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. ४० ते ५० टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण उपचाराअंती लवकर रिकव्हर झाले.
वृद्ध नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी
‘फ्रायब्रोसिस’ असलेल्या रुग्णापैकी १० टक्के रुग्णांना त्वरीत ऑक्सिजनची आवश्यकता भासते. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा तसेच औषधोउपचार केला जात आहे. सदृढ आरोग्यासाठी वृध्द नागरिकांनी नियमित व्यायाम, योगा करणे, तसेच, धूळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, त्याचबरोबर थंड पेय व तेलकट पदार्थ खाणे टाळावे, सकस आहारावर भर देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टर म्हणाले.