जिल्ह्यात शंभर ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:34 AM2021-02-20T05:34:09+5:302021-02-20T05:34:09+5:30
जिल्ह्यात जून,जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्येत दिवसागणिक भर पडू लागली होती. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. ...
जिल्ह्यात जून,जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्येत दिवसागणिक भर पडू लागली होती. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढत होता. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिन्यातही रग्ण वाढीचा वेग कमीच होता. जानेवारी महिन्यात दिवसाकाठी सरासरी १० रुग्णांची नोंद होत होती. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत होते. परिणामी, ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाला झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या खाली होती. मात्र, मागील तीन-चार दिवसापासून बाधितांचा आकडा वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभर इतकी झाली आहे.
सव्वालाख जणांची झाली चाचणी
जिल्ह्यात मागील साडेदहा महिन्याच्या कालावधीत १ लाख २५ हजार ७९७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १३. ६० टक्के म्हणजेच १७ हजार १११ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १६ हजार ४३६ रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६. ६ टक्के इतके आहे.
सर्वाधिक ११ रुग्ण उस्मानाबादेत
जिल्ह्यात शुक्रवारी आरटीपीसीआर चाचणीत ७ व रॅपिड ॲँटीजेन चाचणीत ८ अशा एकूण १५ रुग्णांची भर पडली. यात परंडा तालुक्यात १, तुळजापूर तालुक्यातील ३ रुग्ण आढळून आले आहे. तर उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाली.
मागील चार दिवसात आढळून आलेले रुग्ण
दिनांक रुग्ण
१६ फेब्रुवारी १२
१७ फेब्रुवारी १७
१८ फेब्रुवारी २५
१९ फेब्रुवारी १५