उस्मानाबादेत विनयभंग प्रकरणी एकास कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 07:14 PM2018-10-01T19:14:48+5:302018-10-01T19:15:21+5:30
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती़
उस्मानाबाद : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील घारगाव येथील चुलत सासºयाच्या घरी एक महिला कुटुंबासह राहत होती़ महिलेचा पती व परमेश्वर बंकटराव पवार (रा़ नांदगाव ता़अंबाजोगाई ह़मु़घारगाव) यांची ओळख झाली़ परमेश्वर पवार सतत त्यांच्या घरी येत होता़ तीन वर्षापूर्वी पीडित महिला घरात काम करीत असताना पाठीमागून आलेल्या पवार याने तिच्यावर जबरी अत्याचार केला़ ही घटना कोणास सांगितली तर मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली़ तसेच शेताकडे जात असताना पाठलाग करून मारहाण केल्याची फिर्याद पीडित महिलेने १२ सप्टेंबर २०१७ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली होती़ पीडितेच्या फिर्यादीवरून परमेश्वर बंकटराव पवार विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांच्या समोर झाली़ या प्रकरणात सरकार पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी चार साक्षीदार तपासले़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अॅड़महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी परमेश्वर पवार याला भादंवि कलम ३५४ ड प्रमाणे दोषी धरून एक महिना सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन आठवडे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़
महिलेकडून खोटी साक्ष
या प्रकरणात आरोपीतर्फे पीडित महिलेची उलटतपास घेतेवेळी तिने आरोपीस मदत होईल, अशी साक्ष दिली़ त्यामुळे पीडित फिर्यादी महिलेस न्यायालयाने नोटीस दिली होती़ या नोटीसीच्या उत्तरात पीडित महिलेने तिची चूक झाल्याचे कबूल केले़ न्यायालयाने खोटी साक्ष दिल्यामुळे पीडित महिलेस दोषी ग्राह्य धरून तिला ताकिद देऊन सोडून दिल्याचे अॅड़ देशमुख यांनी सांगितले़.