केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:20+5:302021-06-10T04:22:20+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांनी ३१ मे अखेर जिल्ह्यात केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली ३० ...

Only 14% crop loan disbursement | केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप

केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांनी ३१ मे अखेर जिल्ह्यात केवळ १४ टक्के पीक कर्ज वाटप केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली ३० जूनअखेर दिलेल्या लक्षांकाच्या साठ टक्के पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्रामीण बँका, खासगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. पीककर्ज वाटप करताना शासनाने सन २०२१-२२ हंगामाकरिता पीकनिहाय कर्जदर निश्चित केल्याप्रमाणे कर्ज पुरवठा करावा. याकरिता बँकेतील कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावामध्ये भेट देऊन जनजागृती करावी. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय दुग्धव्यवसाय, कुक्कट पालन, शेळीपालन, आदींसाठीही कर्ज पुरवठा करावा, असे आदेश दिवेगावकर यांनी यावेळी दिले.

Web Title: Only 14% crop loan disbursement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.