भूम तालुक्यातील पंधरापैकी चारच प्रकल्प फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:00+5:302021-09-04T04:39:00+5:30

भूम : एक महिना पावसाळा राहिला असताना तालुक्यातील १५ पैकी केवळ चार प्रकल्प १०० टक्के भरले आहे. उर्वरित ११ ...

Only four out of fifteen projects in Bhum taluka are complete | भूम तालुक्यातील पंधरापैकी चारच प्रकल्प फुल्ल

भूम तालुक्यातील पंधरापैकी चारच प्रकल्प फुल्ल

googlenewsNext

भूम : एक महिना पावसाळा राहिला असताना तालुक्यातील १५ पैकी केवळ चार प्रकल्प १०० टक्के भरले आहे. उर्वरित ११ प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतकरी चिंतेत आहेत, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने माेठ्या पावसाची गरज आहे.

भूम तालुक्यात उस्मानाबाद पाटबंधारे क्र. ३ उपविभागाच्या भूम व ईट शाखेअंतर्गत ८ प्रकल्प येतात. यामध्ये संगमेश्वर मध्यम प्रकल्प ईट, बाणगंगा मध्यम प्रकल्प भूम, रामगंगा मध्यम प्रकल्प रामेश्वर, आरसोली लघू प्रकल्प, कुंथलगिरी लघू प्रकल्प, नांदगाव साठवण तलाव, घुलेवाडी साडवण तलाव व गिरवली सांडवण तलावाचा समावेश आहे, तर पाथरुड शाखेअंतर्गत ७ प्रकल्प येतात. यामध्ये पाथरुड लघू तलाव, बागलवाडी लघू तलाव, जांब लघू तलाव, हिवर्डा लघू तलाव, गोरमाळा लघू तलाव, तित्रंज लघू तलाव व उमाचीवाडी लघू तलाव येतात. भूम व ईट शाखेअंतर्गत येणारा आरसोली लघू प्रकल्प आजघडीला शंभर टक्के भरला आहे. भूम व वाशी शहरासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. भूम व मानकेश्वर मंडळात इतर मंडळाच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने, काही साठवण तलाव व मध्यम प्रकल्प व लघू प्रकल्प भरले आहेत. बाकी मंडळात पाऊस झाला आहे, परंतु, प्रकल्पांतील साठा वाढेल, एवढा नाही. आजघडीला संगमेश्वर मध्यम प्रकल्पात ४९ टक्के साठा झाला आहे. बाणगंगा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. रामगंगा मध्यम प्रकल्प ८९.९२, आरसोली लघू प्रकल्प, कुंथलगिरी साठवण तलाव, नांदगाव साठवण तलाव १०० टक्के भरले आहेत, तर दुसरीकडे घुलेवाडी साठवण तलावात १३.६५ टक्के तर गिरलगाव तलावात अवघा १५.५१ साठा उपलब्ध आहे.

चाैकट...

पाथरुड शाखेअंतर्गत प्रकल्पाची स्थिती...

पाथरुड लघू तलाव ०.७८ टक्के, बागलवाडी लघू तलाव ३१.८६, जांब लघू तलाव ३८.९८, हिवर्डा लघू तलाव ३०.५९, गोरमाळा लघू तलाव २.७, उमाची वाडी लघू तलाव ३९.५५ तर तित्रंज लघू तलावात ०.० टक्के पाणीसाठा आहे.

चौकट

‘साेनगिरी’ ओव्हर फ्लाे

साेनगिरी साठवण तलावाचे बांधकाम पाच ते सहा वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. हा तलाव अद्याप संबंधित एजन्सीकडून पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. असे असले, तरी हा प्रकल्प आजघडीला शंभर टक्के भरला आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

काेट...

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील जवळपास चार प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्प भरण्यासाठी मात्र माेठ्या पावसाची गरज आहे.

-पी.एस. घोडके, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, भूम.

Web Title: Only four out of fifteen projects in Bhum taluka are complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.