उस्मानाबादेत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 06:53 PM2019-01-30T18:53:39+5:302019-01-30T18:56:20+5:30
ष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या स्वयंसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
उस्मानाबाद : ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी लोकपाल व लोक आयुक्त अधिनियमाचे पालन केंद्र व राज्य सरकार करत नसल्याच्या विरोधात बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी बुधवारी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या स्वयंसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
आण्णा हजारे भारतीय नागरिकांच्या हितासाठी भ्रष्टाचार मुक्त देश व्हावा, यासाठी लोकपाल व लोकआयुक्त अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र आणि राज्यातील सरकार या आग्रही मागणीकडे डोळेझाक करीत आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. उपरोक्त मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे बुधवारपासून उपोषणास सुरूवात केली आहे.
आण्णा हजारे यांच्या या उपोषणास पाठींबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या स्वयंसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीसमोर उपोषण केले. उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अॅड. व्ही. डी. माने, अरूण बोबडे, मनोज खरे, सुभाष राठोड, रामेश्वर तोडकर, प्रदिप चंदने आदींची उपस्थिती होती.