उस्मानाबादेत काेराेना लस ‘वेस्टेज’चे प्रमाण शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:07+5:302021-04-29T04:24:07+5:30

उस्मानाबाद : मध्यंतरी राज्यात विराेधी पक्षाने काेराेना लस वेस्टेजचा मुद्दा चांगलाच लावून धरला हाेता. त्यावरून माेठ्या प्रमाणात आराेप-प्रत्याराेपही झाले. ...

In Osmanabad, the incidence of carina vaccine is zero percent | उस्मानाबादेत काेराेना लस ‘वेस्टेज’चे प्रमाण शून्य टक्के

उस्मानाबादेत काेराेना लस ‘वेस्टेज’चे प्रमाण शून्य टक्के

googlenewsNext

उस्मानाबाद : मध्यंतरी राज्यात विराेधी पक्षाने काेराेना लस वेस्टेजचा मुद्दा चांगलाच लावून धरला हाेता. त्यावरून माेठ्या प्रमाणात आराेप-प्रत्याराेपही झाले. यानंतर, तज्ज्ञांनी काही अंशी वेस्टेज असतेच, असेही सांगिले. मात्र, उस्मानाबाद जिल्हा यास पूर्णपणे अपवाद ठरला आहे. १०० पैकी १०० डाेस उपयाेगात आणले जात आहेत. म्हणजेच शून्य टक्के वेस्टेज आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद हा असा एकमेव जिल्हा आहे, तर दुसरीकडे नांदेड लसीच्या वेस्टेजमध्ये अव्वल आहे. वेस्टेजचे प्रमाण १२.५ टक्के एवढे आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. साेबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. असे असतानाही जिल्हास्तरीय आराेग्य यंत्रणेला मागणीनुसार लस उपलब्ध हाेत नाही. उपलब्ध झालेले डाेस संपल्यानंतर चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा वेळी उपलब्ध लसीचा एकही डाेस वाया जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात असे चित्र पाहावयास मिळत नाही. उस्मानाबादच्या आराेग्य यंत्रणेला १०० डाेस प्राप्त झाल्यास हे सर्व डाेस उपयाेगात आणले जात आहेत. म्हणजेच एकही डाेस वाया जाऊ दिला जात नाही. मध्यंतरी केंद्राचे पथक जिल्ह्यात आले हाेते. या पथकानेही ‘शून्य टक्के वेस्टेज’बद्दल लस विभागाच्या पाठीवर काैतुकाची थाप टाकली हाेती. अशा प्रकारे शून्य टक्के वेस्टेजचे उद्दिष्ट गाठणारा उस्मानाबाद हा मराठवाड्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे, तर दुसरीकडे इतर जिल्ह्यातील लसीच्या वेस्टेजचे प्रमाण सध्याच्या शाॅर्टेजच्या काळात चिंता वाढविणारे आहे. लस वाया घालविण्यात नांदेड सर्वात पुढे आहे. यांचे वेस्टेजचे प्रमाण साधारपणे १२.५ टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजेच १०० पैकी जवळपास १२ डाेस वाया जाताहेत. हेच लातूरचे प्रमाण ५.५ टक्के, बीड ६.४७ टक्के, परभणी ८.४ टक्के, जालना ८.५ टक्के, हिंगाेली ५.१ टक्के तर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादेत वेस्टेजचे प्रमाण ६.९ टक्के एवढे आहे. उपराेक्त जिल्ह्यांनी वेस्टेजचे प्रमाण शून्यावर आणल्यास, त्याचा शेकडाे नागरिकांना फायदा हाेऊ शकताे.

चाैकट...

केंद्राच्या टीमकडून काैतुक...

बाधितांचे प्रमाण आणि मृत्युदर वाढल्यानंतर मध्यंतरी केंद्र सरकारचे एक पथक जिल्ह्यात आले हाेते. यावेळी उस्मानाबादमध्ये लसीच्या वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के व कव्हरेचही माेठे असल्याचे समाेर आल्यानंतर संबंधित पथकाने लस विभागाचे काैतुक केले, तसेच काही सेंटरला भेट देऊन पाहणीही केली.

तीन दिवसांपासून प्रतीक्षा...

जिल्हा आराेग्य यंत्रणेने लसीकरणाची क्षमता माेठ्या प्रमाणात वाढविली आहे. सध्या २११ गव्हर्नमेंट तर ५ खासगी सेंटर आहेत. या सेंटरमधून लस दिली जात आहे. रविवारी लसीचे १५ हजार डाेस मिळाल्यानंतर साेमवारी दुपारपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आले. लागलीच १ लाख डाेसची मागणी करण्यात आली, परंतु तीन दिवसांचा कालावधी लाेटला असतानाही लसीचा एकही डाेस मिळालेला नाही.

Web Title: In Osmanabad, the incidence of carina vaccine is zero percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.