उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तब्बल सव्वादोन लाखांची लिड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:26 PM2024-06-04T16:26:28+5:302024-06-04T16:27:04+5:30
Osmanabad Lok Sabha Result 2024: ठाकरे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांची विजयाकडे वाटचाल
Osmanabad Lok Sabha Result 2024 : महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Ninbalkar) यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार निंबाळकर यांना दुपारी २ वाजेपर्यंत ५ लाख ४५ हजार ६७१ मते मिळाली आहेत. त्यांनी तब्बल २ लाख ३६ हजार ४९२ मतांची आघाडी घेतली आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांना ३ लाख ९ हजार १७९ मते मिळाली असून वंचितचे भाऊसाहेब अंधाळकर यांना २३ हजार ९४६ मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना महायुतीचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघातून देखील अपेक्षित मते मिळाली नाहीत. ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल २ लाख ३६ हजार ४९२ मतांची मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
मताचा वाढलेला टक्का ओमराराजे यांच्या पथ्यावर
महायुतीमध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला सुटली होती. यामुळे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये घेऊन मैदानात उतरविण्यात आले होते. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभेसाठी ६३. ८८ टक्के मतदान झाले होते.