डेंग्यूसदृश आजाराचा उमरग्यात उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:28+5:302021-06-27T04:21:28+5:30
उमरगा -उमरगा शहरासह ग्रामीण भागात मागील १५ दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. आजवर जवळपास ३८ व्यक्तींना या आजाराची ...
उमरगा
-उमरगा शहरासह ग्रामीण भागात मागील १५ दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. आजवर जवळपास ३८ व्यक्तींना या आजाराची लागण झाली आहे. तर चिकुनगुनिया अजाराची चाचणी करण्यासाठी ६३ जणांचे नमुने प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दिवसागणिक संख्या वाढत चालल्याने आराेग्य यंत्रणेची झाेप उडाली आहे.
काेराेनाचा संसर्ग काही अंशी कमी झाला असतानाच आता शहरासाेबतच ग्रामीण भागातही डेंग्यू तसेच चिकुनगुनिया सदृश आजाराने थैमान घातले आहे. मागील १५ दिवसांत (९ ते २४ जून) शासकीय तसेच खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश आजाराचे तब्बल ३८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये उमरगा शहरात उमरगा शहरात ११ तर ग्रामीण भागातील येळी ९, गुंजोटी ३, एकोंडी २, दाळिंब २, नारंगवाडी २, कदेर २, कडदाेरा, तुराेरी, तुगाव, सुपतगाव, काेळसूर, नाईचाकूर गावातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणेची झाेप उडाली असून ग्रामपंचायत स्तरावर उपाययाेजना हाती घेण्यात आल्या आहेत. अबेटिंगसाेबतच गावातील पाणीसाठ्यांचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षणही सुरू केले आहे. शहरी तसेच गावांतील पाण्यावर डासांच्या अळ्या आहेत का, याची पाहणी केली जात आहे. अळ्या आढळून आल्यास कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित अळ्यांचे निर्मूलन केले जात आहे. दरम्यान, काही रुग्णांमध्ये चिकुनगुनियाचीही लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा ६३ रुग्णांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी साेलापूर येथील प्रयाेगशाळेत पाठिवण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल आला आहेे. यातील दाेघांना चिकुनगुनिया झाल्याचे समाेर आले आहे. उर्वरित १७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ४३ जणांच्या रक्त नमुन्यांचा अहवाल अद्यापि प्रलंबित आहे.
चाैकट...
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी
उमरगा शहरासह ग्रामीण भागात वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. शिवकुमार हलकुडे, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. एम. आर. पांचाळ यांनी येळी, येणेगूर, गुंजाेटी आदी गावांना भेट देऊन उपायाेजनांचा आढावा घेेतला. तसेच उमरगा पालिकेतील आराेग्य विभागासह बैठक घेऊन सूचना केल्या.
काेट...
उमरगा तालुक्यात पंधरा दिवसांत डेंग्यूसदृश रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. आम्ही प्रभावित गावात उपाययोजना सुरू केल्या असून जनजागृती, साफसफाई, फवारणी अभियान राबवित आहाेत. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन आराेग्य तपासणी केली जात आहे.
- डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, उमरगा.