साडेनऊ हजारांवर इच्छुकांची आखाड्यात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:10+5:302021-01-01T04:22:10+5:30

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, त्यापूर्वी अर्ज ऑनलाइन ...

Over nine and a half thousand aspirants jumped into the arena | साडेनऊ हजारांवर इच्छुकांची आखाड्यात उडी

साडेनऊ हजारांवर इच्छुकांची आखाड्यात उडी

googlenewsNext

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, त्यापूर्वी अर्ज ऑनलाइन भरावा लागत होता. विविध तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारपर्यंत केवळ २ हजार ३०४ अर्ज दाखल झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी अर्ज ऑफलाइन दाखल करण्यास मुभा दिल्याने एकाच दिवशी सर्व तहसीलच्या ठिकाणी तोबा गर्दी झाली. वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची होती. मात्र, या वेळेत कॅम्पसमध्ये दाखल असलेल्या उमेदवारांचे अर्ज रात्री उशिरापर्यंत घेण्यात आले. त्यामुळे थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेसात हजारांवर अर्ज एकाच दिवशी दाखल झाले. यावरून ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी किती रस घेतला आहे, याचीच प्रचिती या आकडेवारीवरून येत आहे. दरम्यान, काही ग्रामस्थांनी मात्र सामंजस्य दाखवून प्रत्येकी एकच अर्ज दाखल करून बिनिवरोध निवडीही केल्या.

तालुकानिहाय दाखल अर्ज....

उस्मानाबाद १७८४

तुळजापूर १२१८

उमरगा १२७०

लोहारा ४९४

कळंब १३५५

वाशी ७७७

भूम १३९३

परंडा १५३४

Web Title: Over nine and a half thousand aspirants jumped into the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.