उस्मानाबादेत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:51+5:302021-06-02T04:24:51+5:30

उस्मानाबाद : कोरोना बाधितांसाठी असलेली आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँकेची उभारणी करण्यात आली ...

Oxygen Concentrator Bank started in Osmanabad | उस्मानाबादेत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँक सुरू

उस्मानाबादेत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँक सुरू

googlenewsNext

उस्मानाबाद : कोरोना बाधितांसाठी असलेली आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँकेची उभारणी करण्यात आली आहे. या बँकेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ३५ कॉन्सेंट्रेटर उपलब्ध झाले असून, त्यांचे लोकार्पण माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बँकेची स्थापना भाजपच्या प्रतिष्ठान भवन येथे करण्यात आली आहे. येथून गरजूंना हे कॉन्सेंट्रेटर पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. शिवाय, कोरोना आजारातून बरे झालेले व घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांनाही ही मदत पुरविण्यात येणार आहे. यासाठी प्रतिष्ठान भवन येथे नोंदणी करून कॉन्सेंट्रेटर मिळविता येणार आहेत. यासाठी प्रभाकर मुळे, प्रा.डॉ. प्रशांत कोल्हे व प्रा.डॉ. डी. बी. मोरे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकार्पणप्रसंगी आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धिजिवी प्रकोष्ठचे प्रदेश सहसंयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,‍ विनोद गंगणे, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विजय आबा कंदले, बापूसाहेब कणे, देवा नायकल, अशिष नायकल, संदीप साळुंके, डॉ. चंद्रजित जाधव, अभिजित काकडे, देवकन्या गाडे, गुणवंतराव देशमुख, निहाल काजी, अजित मेटे, विशाल पाटील, सूरज शेरकर, महेश चांदणे, प्रमोद देशमुख उपस्थित होते.

Web Title: Oxygen Concentrator Bank started in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.