सरपंचपदी पालमपल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:28+5:302021-02-10T04:32:28+5:30

माडज : उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सिद्धाराम पालमपल्ले तर उपसरपंच भाग्यश्री करनुरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी ...

Palampalle as Sarpanch | सरपंचपदी पालमपल्ले

सरपंचपदी पालमपल्ले

googlenewsNext

माडज : उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सिद्धाराम पालमपल्ले तर उपसरपंच भाग्यश्री करनुरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून पी. आर. दूधभाते उपस्थित होते. यावेळी नाईचाकूरचे तलाठी व्ही. बी. कोळी, गणेश गडरकर, ग्रामसेवक जी. एस. बुलबुले, नूतन सदस्य सिद्राम पालमपल्ले, मंडुबाई लजारे, गायत्री पालमपल्ले, प्रकार चिरे, शकुंतला वाघमोडे, निर्मलाबाई कांबळे, भाग्यश्री करनुरे, दिगंबर वाघमोडे, सिंधू करनुरे उपस्थित होते.

‘विकेल ते पिकेल’ योजनेस प्रारंभ

सोनारी : परंडा तालुक्यातील बावची येथे कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी दत्तू खटके यांच्या प्रयत्नातून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीसाठी फळे व भाजीपाला स्टॉलचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एम. आर. मोरे, एम. आर. तावरे, के. एच. देवकर, व्ही. डी. नलवडे, ए. आर. पाटील, नानासाहेब मिस्किन व शेतकरी विकास थिटे, जालिंदर गायकवाड, सिद्धेश्वर गायकवाड, बाबू सायकर, रघुनाथ खरडे, गोकुळ जठार आदी उपस्थित होते.

बसअभावी होतेय विद्यार्थ्यांची गैरसोय

कळंब : तालुक्यातील आढाळा व हासेगाव (केज) या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे एस. टी. बस अभावी प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही गावाची बस पूर्ववत लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, भिमा हगारे, अतुल धुमाळ, अजय जाधव, शिवम वायसे, नवनाथ झिरमाळे, स्वप्निल चिलवंत, मनोज शिंदे आदींच्या सह्या आहेत.

सरपंचपदी गिरी, उपसरपंचपदी भोसले

उमरगा : तालुक्यातील मातोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विलास गिरी तर उपसरपंचपदी अर्जुन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले, माजी सरपंच विठठलराव पाटील, गामसेवक एल. एम. कुसळकर, कमलाकर भोसले, ॲड. ज्ञानेश्वर भोसले, ग्रा. पं. सदस्य इंदूमती पाटील, महिंद भालेराव, सोनाबाई सरपाळे, प्रतिभा सुर्यवंशी, कोमल भोसले आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ

तुळजापूर : उस्मानाबाद येथील मैनूद्दीन पठाण यांची ऑल इंडिया मोटार मालक संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी व खलील पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातीलल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हाजी गौस बागवान, हाजी जावेद बागवान, हाज्जुमिया आतार, फिरोज हमीद पठाण, आरिफ बागवान, अशपाक शेख, वाहेद शेख, मतीन बागवान, रफिक बागवान, अशपाक सय्यद, मोहसीन बागवान, बब्बू बागवान, नूर बागवान, अझर आतार, असिफ शेख, अझर शेख आदी उपस्थित होते.

कोनाळे यांचा सत्कार

(फोटो : कोनाळे सत्कार ०९)

उस्मानाबाद : येथील सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे, श्रीकांत मटकीवाले, मुकेश मोटे, रवी कांबळे आदी उपस्थित होते.

परंडा: येथील शासकीय विश्रामगृहात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. शिंदे, महिलाध्यक्षा अनुराधा लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, जिल्हा प्रवक्ते तानाजी बनसोडे, धनंजय सोनटक्के, जानराव, मोहन बनसोडे, दीपक ओव्हाळ, दयानंद बनसोडे, किरण बनसोडे, वाघमारे, रणधीर मिसाळ, प्रकाश बनसोडे, नवनाथ कसबे, कानिफनाथ सरपणे, संदीपान कांबळे, स्वपनील पोळ, धनाजी पोळ आदी उपस्थितीत होते. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले कानीफनाथ सरपणे, फारुक शेख यांचा सत्कार करण्यात आला . पत्रकार मुजीब काझी यांना राजर्षी पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला

सरपंचपदी पालमपल्ले

(दोन सिंगल किंवा डीसी फोटो : दिनेश पाटील ०९)

माडज : उमरगा तालुक्यातील भगतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सिद्धाराम पालमपल्ले तर उपसरपंच भाग्यश्री करनुरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून पी. आर. दूधभाते उपस्थित होते. यावेळी नाईचाकूरचे तलाठी व्ही. बी. कोळी, गणेश गडरकर, ग्रामसेवक जी. एस. बुलबुले, नूतन सदस्य सिद्राम पालमपल्ले, मंडुबाई लजारे, गायत्री पालमपल्ले, प्रकार चिरे, शकुंतला वाघमोडे, निर्मलाबाई कांबळे, भाग्यश्री करनुरे, दिगंबर वाघमोडे, सिंधू करनुरे उपस्थित होते.

‘विकेल ते पिकेल’ योजनेस प्रारंभ

सोनारी : परंडा तालुक्यातील बावची येथे कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी दत्तू खटके यांच्या प्रयत्नातून शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीसाठी फळे व भाजीपाला स्टॉलचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एम. आर. मोरे, एम. आर. तावरे, के. एच. देवकर, व्ही. डी. नलवडे, ए. आर. पाटील, नानासाहेब मिस्किन व शेतकरी विकास थिटे, जालिंदर गायकवाड, सिद्धेश्वर गायकवाड, बाबू सायकर, रघुनाथ खरडे, गोकुळ जठार आदी उपस्थित होते.

बसअभावी होतेय विद्यार्थ्यांची गैरसोय

कळंब : तालुक्यातील आढाळा व हासेगाव (केज) या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे एस. टी. बस अभावी प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही गावाची बस पूर्ववत लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, भिमा हगारे, अतुल धुमाळ, अजय जाधव, शिवम वायसे, नवनाथ झिरमाळे, स्वप्निल चिलवंत, मनोज शिंदे आदींच्या सह्या आहेत.

सरपंचपदी गिरी, उपसरपंचपदी भोसले

उमरगा : तालुक्यातील मातोळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विलास गिरी तर उपसरपंचपदी अर्जुन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले, माजी सरपंच विठठलराव पाटील, गामसेवक एल. एम. कुसळकर, कमलाकर भोसले, ॲड. ज्ञानेश्वर भोसले, ग्रा. पं. सदस्य इंदूमती पाटील, महिंद भालेराव, सोनाबाई सरपाळे, प्रतिभा सुर्यवंशी, कोमल भोसले आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ

तुळजापूर : उस्मानाबाद येथील मैनूद्दीन पठाण यांची ऑल इंडिया मोटार मालक संघाच्या राष्ट्रीय सचिव पदी व खलील पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग) जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातीलल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हाजी गौस बागवान, हाजी जावेद बागवान, हाज्जुमिया आतार, फिरोज हमीद पठाण, आरिफ बागवान, अशपाक शेख, वाहेद शेख, मतीन बागवान, रफिक बागवान, अशपाक सय्यद, मोहसीन बागवान, बब्बू बागवान, नूर बागवान, अझर आतार, असिफ शेख, अझर शेख आदी उपस्थित होते.

कोनाळे यांचा सत्कार

(फोटो : कोनाळे सत्कार ०९)

उस्मानाबाद : येथील सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे, श्रीकांत मटकीवाले, मुकेश मोटे, रवी कांबळे आदी उपस्थित होते.

कॅरीबॅगचा वापर सुरूच

उस्मानाबाद : शासनाने कॅरीबॅगवर बंदी आणली असली तरी जिल्ह्यात मात्र याचा सर्रास वापर सुरूच आहे. किराणा इतर दुकाने तसेच हातगाड्यावर भाजीपाला, फळे विक्री करणाऱ्यांकडून देखील ग्राहकांना कॅरिबॅग उपलब्ध होत असल्यामुळे यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

अवैध धंदे वाढले

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्यांतर्गत गावात अवैध दारू विक्री, मटका, जुगार यासारखे धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे पीढी याच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत असून, यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Web Title: Palampalle as Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.