मनाई आदेश झुगारून पानटपरी सुरू ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:06+5:302021-05-05T04:53:06+5:30
उस्मानाबाद : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील रामनगर ...
उस्मानाबाद : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील रामनगर भागातील एका पानटपरी चालकाविरूद्ध २ मे राेजी आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काेविडचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. काही निर्बंधही घातले आहेत. मात्र, असे असतानाही काही व्यावसायिकांकडून आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. त्यांच्याविरूद्ध आता थेट पाेलिसात गुन्हा दाखल केला जात आहे. असाच प्रकार २ मे राेजी समाेर आला. शहरातील सिध्दीक इस्माईल शेख यांनी रामनगर भागातील जाॅनी हाॅटेलच्या बाजूला असलेले पान दुकान सुरू ठेवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानंतर संबंधिताविरूद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात सरकार पक्षाच्यावतीने पाेलीस काॅन्स्टेबल ज्ञानेश्वर कागदे यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून शेख यांच्याविरूद्ध भादंसंचे कलम १८८, २६९सह काेविड - १९ उपाययाेजना अधिनियम कलम ११चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.