परंड्यात परशुराम जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:35+5:302021-05-16T04:31:35+5:30
मशागतींना वेग उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथे खरीपपूर्व कामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकरी मशागतीच्या कामात मग्न ...
मशागतींना वेग
उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथे खरीपपूर्व कामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकरी मशागतीच्या कामात मग्न असल्याचे शेतशिवारात पाहावयास मिळत आहे. मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरला पसंती दिली जात आहे. त्यामुळे वेळेची बचत होते. त्यामुळे परंपरागत बैलजोडीऐवजी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरला अधिक मागणी वाढली आहे. अगाेदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी खरीप हंगाम साथ देईल, अशी अशा बाळगून शेतकरी जाेमाने कामाला लागले आहे.
तालुकाध्यक्षपदी माळवदकर यांची निवड
लोहारा : येथील अक्षता माळवदकर यांची राष्ट्रवादी युवकी काँग्रेसच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड कण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्षा दीपाली सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. याबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, सुनील साळुंके, नाना पाटील, सुलोसना रसाळ, सुनील ठेले, बाळासाहेब लांडगे, हाजीबाबा शेख, शरिफा सय्यद, निहाल मुजावर, हेमंत माळवदकर, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण लागू करा’
उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण हे मराठा समाजावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निवेदनावर ॲड. तानाजी चाैधरी, अतुल गायकवाड, आशिष पाटील, संदीप लाकाळ, बालाजी नाईकनवरे, हनुमान हुंबे, प्रदीप जाधव, दिनेश चाैगुले, सर्जेराव गायकवाड, धनराज बिराजदार, राजकुमार देशमुख, आकाश मुंडे, मनोज पाटील, विकास गडकर, आदित्य देशमुख, दत्ता कवडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तलावातील पाणी उपसा बंद करण्याची मागणी
परंडा : तालुक्यातील अनाळा येथील उपसा सिंचन तलावातील पाणी उपसा बंद करावा, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, अनाळ, इनगोंदा या गावासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठीच्या पाण्याची सोय तलावातून केली जाते. तलावात सद्य:स्थितीत मृत अवस्थेत पाणी साठा आहे. तरीही काही शेतकरी शेतीसाठी पाण्याचा उपसा करीत आहेत. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाणी उपसा बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
‘कोरोनाग्रस्त रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ द्या’
उस्मानाबाद : सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी जनता दलाचे (से.) प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. रेवण भोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, अनेक नागरिक खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दंड सहन करून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यातील पात्र रुग्णांचा या योजनेत समावेश करून त्यांना याचा लाभ देण्यात यावा, असेही म्हटले आहे.
जागजीत आरोग्य सर्वेक्षण मोहीम
उस्मानाबाद : तालुक्यातील जागजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत गावात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच बापू बनसोडे, उपसरपंच वैजिनाथ सावंत, ग्रामसेवक सचिन वाघे, पोलीस पाटील सुभाष कदम, तलाठी कासराळे, दीपक सावंत, चंद्रकांत माळी, रणधीर पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी नऊ टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.