‘आई-वडिलांचे संस्कार जीवनाला वळण देतात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:03+5:302021-02-24T04:34:03+5:30
मुरूम येथे शरण पाटील मित्रमंडळच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित कीर्तनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, छत्रपती ...
मुरूम येथे शरण पाटील मित्रमंडळच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित कीर्तनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवकांना सतत प्रेरणादायी राहिले आहे. शिवाजी महाराजांचे कार्य समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणारे असून, सामाजिक जडणघडणीमध्येही त्यांचे मोलाचे कार्य राहिले आहे. अशा महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, नगराध्यक्षा अनिता अंबर, जिल्हा परिषदेचे सदस्य रफिक तांबोळी, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, बबनराव बनसोडे, नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, सरपंच योगेश राठोड, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, ओमकार पाटील, गौस शेख, उत्कर्ष गायकवाड, प्रणीत गायकवाड आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केले. आभार देवराज संगुळगे यांनी मानले.