पाथरुड , बागलवाडी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:39 AM2021-09-10T04:39:50+5:302021-09-10T04:39:50+5:30
पाथरुड : गेल्या चार दिवसांपासून पाथरुड परिसरात होत असलेल्या जोरदार पावसाने तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे ...
पाथरुड : गेल्या चार दिवसांपासून पाथरुड परिसरात होत असलेल्या जोरदार पावसाने तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भूम तालुक्यातील पाथरुड येथील मध्यम (लघु) प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे पाथरुडसह परिसरातील दुधोडी, नान्नजवाडी या भागातील शेकडो हेक्टर क्षेत्राच्या क्षेत्राच्या सिंचनाचा प्रश्न मिटला असून रबी हंगामातून मोठ्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याच भागात असलेला बालवाडी येथीलही तलाव भरल्याने या भागातील पुढील काळातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पाथरुड परिसरात पाथरुड व बागलवाडी असे दोन मध्यम (लघु) प्रकल्प आहेत. मागील वर्षीही हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला होता. याहीवर्षी बागलवाडी व पाथरुड येथील प्रकल्प भरल्याने या दोन्ही तलावाच्या माध्यमातून पाथरुड, दुधोडी, नान्नजवाडी, बागलवाडी या गावांमधील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे रबी हंगामाला याचा चांगला फायदा होईल, असे शेतकरी सांगत आहेत.
070921\45521250-img-20210907-wa0022.jpg
□ , बागलवाडी मध्यम प्रकल्प ओव्हरफुल शेकडो हेक्टर शेतीला होणार फायदा.