वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लोकांनी उडविले ६८ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:03+5:302021-07-01T04:23:03+5:30
वर्षभरात कोरोनाचे संकट असल्याने उद्योग, व्यवसाय मंदावले होते. त्यामुळे बाजारपेठही थंडच होती. असे असले तरी वाहनांची खरेदी मात्र कमी ...
वर्षभरात कोरोनाचे संकट असल्याने उद्योग, व्यवसाय मंदावले होते. त्यामुळे बाजारपेठही थंडच होती. असे असले तरी वाहनांची खरेदी मात्र कमी न होता वाढली आहे. लॉकडाऊन, जिल्हाबंदी, सार्वजनिक वाहने बंद असल्याने अनेक नागरिकांनी स्वत:चे वाहन असावे. यावर विशेष भर दिला. ऐपतीनुसार दुचाकी तर काहींनी चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. नवे वाहन घेतल्यानंतर वाहनाला आपल्या आवडीचा नंबर मिळावा, यासाठी जिल्हाभरातून अनेकजण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे अर्ज करतात. विशेषत: राजकीय नेते किंवा प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या वाहनाला पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी आग्रही असतात. अंकशास्त्रावर श्रध्दा असणारे, जन्मतारखेचा अंक काहीजण लकी मानणारे अंक मिळावे, यासाठी प्रयत्नरत असतात. चौदा महिन्यात ६८ लाख खर्च केले आहेत.
...तर नंबरसाठी होतो लिलाव
दुचाकी आणि चारचाकी वाहनाला एकाच विशिष्ट नंबरसाठी अनेक अर्ज आले तर त्यासाठी लिलावदेखील केला जातो.
उस्मानाबाद जिल्ह्यात विशिष्ट नंबरची मागणी करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने असे प्रसंग क्वचित घडत असतात.
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत १ हजार १२८ वाहनचालकांनी फॅन्सी क्रमांकासाठी ९० लाख ७ हजार ५०० रुपये मोजले होते. तर एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ८१८ वाहनचालकांकडून ६४ लाख ८४ हजार रुपये खर्च केले तर तर या वर्षीही एप्रिल २०२१ ते मे २०२१ या कालावधीत ४५ वाहनचालकांनी ३ लाख १६ हजार रुपये फॅन्सी क्रमांकासाठी मोजले आहेत.
कोट...
युवावर्गामध्ये फॅन्सी क्रमांकाची क्रेझ आहे. महागडे वाहन घेतल्यानंतर आपल्या वाहनाला आवडेल असाच क्रमांक मिळावा, यासाठी इच्छुक असतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत आहे. मेट्रोसिटीच्या तुलनेत आपल्याकडे मध्यम स्वरूपाच्या किमतीच्या नंबरला ग्राहक पसंती दर्शवित आहेत. जिल्ह्यात फॅन्सी नंबरला प्रतिसाद दिसून येत आहे.
गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
या तीन नंबर्संना सर्वाधिक मागणी
२५२५२५
२५००
या नंबरचे रेट सर्वात जास्त
९ १ लाख ५० हजार
५५५५ ७० हजार
११११ ५० हजार