बेडवरून उठताही येत नाही, अशा व्यक्तींना गावातच दिली जात आहे लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:54+5:302021-07-26T04:29:54+5:30
हायरिस्कमध्ये कोण... प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. शिवाय गरोदर महिला, मधुमेह, उच्चरक्तदाब, अर्धांगवायू, कॅन्सर, रक्तदाब, ...
हायरिस्कमध्ये कोण...
प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. शिवाय गरोदर महिला, मधुमेह, उच्चरक्तदाब, अर्धांगवायू, कॅन्सर, रक्तदाब, किडनीविकार असे आजार असलेल्या व्यक्ती हायरिस्कमध्ये असतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे.
मला लस कधी मिळणार...
गुडघा आणि पाठीच्या आजारामुळे उठता येत नाही. त्यामुळे अद्याप लस मिळालेली नाही. गावात लस आली होती. मात्र, केंद्रावर जाणे कठीण आहे. आता घरी लस मिळणार आहे, अशी वार्ता ऐकली आहे. लस कधी मिळते याची वाट पाहत आहे.
गैबी शेख, कसबे तडवळा
ग्रामीण भागात लसीकरण सुरू झाले आहे. महिन्यात एकच वेळेस कर्मचारी येऊन गेले आहे. त्यानंतर लसीकरणासाठी कोणी आले नाहीत. त्यामुळे लसीकरण खोळंबले आहे. शंभरच डोस उपलब्ध असतात. त्यामुळे सलग आठ दिवस तर एकाच गावात लसीकरण मोहीम सुरू ठेवावी.
श्रावण ओव्हाळ
जिल्ह्यातील ७२० गावांपैकी ४५० गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. ग्रामीण भागात ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जात आहे. ६० वर्षांपुढील व्यक्ती, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहे. अंथरुणाला खिळून राहिलेल्या व्यक्तींना थेट घरी जाऊन लस देण्याबाबत शासनाकडून लेखी सूचना आलेल्या नाहीत. तशा सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार नियोजन केले जाणार आहे.
डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी
पॉईंटर..
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस ३४०९१२
दोन्ही डोस ९८०४८
६० पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस ११९०४५
दोन्ही डोस ४३४७४