पीक नुकसानीचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:21+5:302021-08-27T04:35:21+5:30

भूम : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची वतीने तातडीने बांधावर जाऊन पंचनामा करावा, अशी मागणी येथील छावा क्रांतिवीर सेना ...

Perform crop damage inquiries | पीक नुकसानीचे पंचनामे करा

पीक नुकसानीचे पंचनामे करा

googlenewsNext

भूम : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची वतीने तातडीने बांधावर जाऊन पंचनामा करावा, अशी मागणी येथील छावा क्रांतिवीर सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकासह इतर पालेभाज्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे याचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी व शेतमजुरांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा छावा क्रांतिवीर सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना ७ सप्टेंबर रोजी एक दिवस लाक्षणिक उपोषण करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, छावा क्रांतिवीर सेनेचे युवक तालुकाध्यक्ष गणेश नलवडे, तालुकाध्यक्ष अमृत भोरे, प्रा. डॉ. बिभीषण भैरट, महेश येडे, शरद खडागळे, राहुल ताबारे, सुधाकर सपकाळ, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Perform crop damage inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.