राखेवर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:11+5:302021-03-14T04:28:11+5:30
भूम : येथील बिभीषण सरवदे यांच्या निधनानंतर अंत्यविधीची राख पाण्यात टाकण्याऐवजी याच राखेत वृक्षारोपण करून मयताच्या स्मृती जागृत ठेवण्याचे ...
भूम : येथील बिभीषण सरवदे यांच्या निधनानंतर अंत्यविधीची राख पाण्यात टाकण्याऐवजी याच राखेत वृक्षारोपण करून मयताच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम त्यांचे मित्र तात्या कांबळे यांनी केले आहे.
माठांना मागणी
(फाईल फोटो घेणे)
येडशी : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे येडशीसह परिसरातील गावात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांची मागणी वाढली असल्याचे दिसत आहे.
केसरे यांची नियुक्ती
कळंब : संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्यध्यक्षपदी तालुक्यातील गौर येथील भगवान दत्तू केसरे यांची नियुक्ती झाली. जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.
लसीकरण सुरू
तेर : येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. येथे पहिल्याच दिवशी २७ जणांनी लस घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
‘अर्ज करा’
उस्मानाबाद : मुरघास निर्मितीच्या सायलेज बेलर युनिटच्या यंत्रणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकाच संस्थेला या योजनेचा लाभ द्यावयाचा असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.