वृक्षारोपण, कार्यालयाच्या सौंदर्यतेवर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:52+5:302021-05-30T04:25:52+5:30
(फोटो : जिल्हा परिषद २९) उस्मानाबाद : सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण ...
(फोटो : जिल्हा परिषद २९)
उस्मानाबाद : सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण व कार्यालयाच्या सौंदर्यतेवर कर्मचाऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमानंतर डॉ. विजयकुमार फड यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, कुंभार, नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले, शिक्षणाधिकारी सुसर, कृषी विकास अधिकारी चिमनशेट्टे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मोहरे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
गाव लोकसंख्येच्या तीनपट वृक्ष लागवड मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. यासाठी गावनिहाय पडीक जमिनीसह शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे डॉ. फड यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद अंतर्गत साधारणपणे १५ हजार कर्मचारी प्रत्येक गावनिहाय सेवेत आहेत. सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम ज्या पद्धतीने राबवला जात आहे. त्यानुसार गावातील प्रत्येक शिक्षक अंगणवाडी,आशा कार्यकर्ती, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या मदतीने वृक्ष लागवड चळवळीच्या स्वरूपात एक आदर्श असा उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.