न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:00+5:302021-07-10T04:23:00+5:30
जिल्ह्यातील बालकांचा जन्म-मृत्युदर वर्ष जन्म ...
जिल्ह्यातील बालकांचा जन्म-मृत्युदर
वर्ष जन्म अर्भक मृत्यू बालमृत्यू
२०१७-१८ १४.४६ ८.१८ १४.७
२०१८-१९ १३.३७ ७.९१ १३.०
२०१९-२० १२.८० ८.८० १३.३
चौकट
काय आहे न्युमोकोकल न्यूमोनिया
न्यमोकोकल न्यूमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा त्रास आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. बालकांना याचा धोका संभवतो.
या आजाराची लक्षणे काय
खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास ही या आजाराची लक्षणे आहेत, जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या पिण्याची अडचण येऊ शकते. तसेच फिट येऊ शकते. त्यामुळे ते बेशुद्धदेखील होऊ शकतात. लहान बालकांमध्ये संसर्गाचा धोका संभवतो.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत नियमित लसीकरण
बालकांना न्यूमोकोकल लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. बालक सहा आठवड्यांचे झाल्यानंतर पहिला, चौदा आठड्यानंतर दुसरा, तर नऊ महिन्यानंतर बुस्टर डोस देण्यात येईल. ही मोहीम सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सुरू राहील.
कोट...
न्यूमोकोकल लसीकरण मोहिमेबाबत जिल्हास्तरावर वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण झाले आहे. तालुकास्तर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रशिक्षण झाले आहे. जिल्ह्यात लवकरच मोहीम राबविली जाणार आहे. यातून न्यूमोकाकल न्यूमोनिया आजारामुळे होणारे मृत्यू थांबण्यास मदत होईल.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी