नालीच्या पाण्यामुळे रस्त्यावर साचले तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:33+5:302021-06-01T04:24:33+5:30

उमरगा : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या साने गुरूजी नगरमधील पतंगे रस्ता ते एकोंडी रस्त्यावर दररोज नालीचे घाण पाणी साचत ...

Ponds on the road due to drainage water | नालीच्या पाण्यामुळे रस्त्यावर साचले तळे

नालीच्या पाण्यामुळे रस्त्यावर साचले तळे

googlenewsNext

उमरगा :

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या साने गुरूजी नगरमधील पतंगे रस्ता ते एकोंडी रस्त्यावर दररोज नालीचे घाण पाणी साचत आहे. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत असून, नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांमधून केला जात आहे.

पतंगे रोडवरून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, अजय नगर, महात्मा बसवेश्वर विद्यालय, जकापूर कॉलनी या भागातील नागरिकांना नगर परिषद, तहसील, कोर्ट, पंचायत समिती, आदर्श विद्यालय गटशिक्षण कार्यालय आदी ठिकाणी ये-जा करण्याचा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, रस्त्यावर नेहमी घाण पाणी साचलेले असते. पोलीस निवासस्थानातून बाहेर येणाऱ्या पाण्याला योग्य दिशा मिळण्यासाठी नालीचे काम झालेले नाही. त्यामुळे जवळपास दोन-तीनशे मीटर अंतरात घाण पाणी साचून राहते. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी सिमेंट रस्ता खोदून महिन्याचा कालावधी लोटला. परंतु, पालिकेकडे पाईप उपलब्ध नसल्याने हे काम अर्धवट राहिल्याचे सांगितले जात आहे. या भागातून ये-जा करत असताना नागरिकांना झाडेझुडपांसह उघड्या विद्युत डीपी देखील धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Ponds on the road due to drainage water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.