सिंदगावातील विद्यार्थ्याने साकारलेल्या पाेट्रेटची ‘इंडिया बुक’मध्ये नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:19 AM2021-07-24T04:19:52+5:302021-07-24T04:19:52+5:30

तुळजापूर : लहानपणापासूनच चित्रकला, संगीत, गायन व रांगोळीची आवड असलेल्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या १७ वर्षीय ...

The portrait of a student from Sindgaon is recorded in the India Book | सिंदगावातील विद्यार्थ्याने साकारलेल्या पाेट्रेटची ‘इंडिया बुक’मध्ये नाेंद

सिंदगावातील विद्यार्थ्याने साकारलेल्या पाेट्रेटची ‘इंडिया बुक’मध्ये नाेंद

googlenewsNext

तुळजापूर : लहानपणापासूनच चित्रकला, संगीत, गायन व रांगोळीची आवड असलेल्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्तकलेतून साकारलेेल्या २७ ‘पोट्रेट’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. उराशी बाळगलेली जिद्द अन् त्याला मेहनतीची सांगड घालून प्रस्थापित केलेला हा विक्रम तुळजापूर तालुक्यातील जगदीश सुतार या युवकाला नवीन ओळख निर्माण करून देणारा ठरला आहे.

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील जगदीश बसवराज सुतार हा १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. घरची परिस्थिती बेताचीच. वडील पेंटिंगसाेबतच जिल्हा परिषद शाळेत पाेषण आहार शिजविण्याचे काम करतात, तर आई शिवणकाम करून कुटुंबाचा गाडा हाकण्यास आर्थिक हातभार लावते. जगदीशसुद्धा पेंटिंगच्या कामामध्ये वडिलांना मदत करतो. जगदीशला संगीत, गायन, रांगोळी व चित्रकलेची आवड तशी लहानपणापासूनच. मात्र, त्याने इयत्ता दहावीची परीक्षा दिली आणि चित्रकलेमध्ये स्वतःला झोकून देऊन तो सध्या वॉटर कलर पेंटिंग, ऑइल पेंटिंग, तसेच पोट्रेट फोटो तो काढतो. आजपर्यंत त्याने अनेक नेत्यांसह अभिनेत्यांचे स्केचेस काढले आहेत. एवढेच नाही तर त्याने शारदीय नवरात्र कालावधीत देवीची थ्री-डी हायपर रांगोळी ४ बाय ४ मध्ये अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण केली होती. त्याने आतापर्यंत जवळपास २५० ते ३०० स्केचेस काढले आहेत. त्याने पिंपळाच्या पानावर शिवरायांचे चित्रही रेखाटले होते. केंद्र सरकारकडून कला-क्रीडा-शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरीला कौतुक म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात पात्र व्यक्तीची व त्यांच्या कार्याची नोंद केली जाते. यामध्ये जगदीशने ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवून त्यात त्याच्या २७ चित्रांची निवड करण्यात आली. यात त्याला यशही मिळाले. त्याला राष्ट्रीय प्रमाणपत्र, मेडल, आबीआर होल्डरचे आयडी कार्ड, बॅच, कार स्टिकर्स आणि अद्वितीय असा इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डचा पेन देऊन गौरविण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार हा कोरोनामुळे पोस्टामार्फत त्याच्या घरी पोहोच केला आहे.

प्रतिक्रिया...

इयत्ता तिसरीच्या वर्गात असताना जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रमेश बालवाड यांनी मला चित्रकलेची वही व रंगाचे पेन दिले हाेते. तेव्हापासून माझ्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण झाली हाेती. सदरील वही जुनी झाली आहे. मात्र, आजही ती जपून ठेवली आहे. मी कितीही माेठा झालाे तरी हा ठेवा माझ्यासाठी माैल्यवान आहे. घरामध्ये वडील पेंटिंगचे काम करीत असल्याने चित्रकलेची आवड अधिक वृद्धिंगत झाली.

-जगदीश सुतार, सिंदगाव

230721\img-20210723-wa0068.jpg

तुळजापुर फोटो

Web Title: The portrait of a student from Sindgaon is recorded in the India Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.