२२ गावांचा वीजपुरवठा सहा तास राहिला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:34+5:302021-05-06T04:34:34+5:30
येणेगूर - आउटेजच्या नावाखाली येणेगूर व बलसूर उपकेंद्रातील २२ गावांची वीज तब्बल सहा बंद केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी ...
येणेगूर - आउटेजच्या नावाखाली येणेगूर व बलसूर उपकेंद्रातील २२ गावांची वीज तब्बल सहा बंद केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी सकाळी बंद केलेला वीजपुरवठा दुपारी साडेतीन वाजता पूर्ववत झाला.
उमरगा १३२ उपमुख्य केंद्रातून येणेगूर, बलसूर व सास्तूर ३३ केव्ही उपकेंद्राला जोडलेले अंतर केळ ३५ किमी आहे. मान्सूनपूर्व देखभालीचे दर मंगळवारी केवळ चार किलाेमीटर अंतराचे काम करण्यात येत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील मंगळवारी सहा ते आठ तास वीज बंद केली जाते. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊन जारी केले आहे. अकारण घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे सध्या बहुतांश लाेक घरातच आहे. भरीस भर म्हणून सध्या दिवसही उन्हाळ्याचे आहेत. दहा मिनिटेही वीज नसेल तर घरात थांबवणे कठीण हाेत आहे. अशा अडचणीच्या काळात वीज कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या ताेडण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर करणे अपेक्षित आहे. या प्रकाराबाबत सर्वसामान्यांसाेबतच शेतकऱ्यांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चाैकट...
उमरगा उपअभियंता शेंडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ३३ केव्ही लाइनवरील झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. यात आमचाही नाइलाज असल्याचे म्हटले. तसेच येणेगूर उपकेंद्राला माेठ्या प्रमाणात सहकार्य केले जाते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
चाैकट..
उमरगा व लोहारा उपअभियंता कार्यालयाचा एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे वीज खंडित हाेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. प्रकार उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील दोन वीज वितरण कार्यालये लाेहाऱ्याला जोडली आहेत. बहुदा त्यामुळेच उमरगा उपअभियंता कार्यालय येणेगूर ३३ केव्ही उपकेंद्राकडे दुर्लक्ष करीत असावे, असा आराेप शेतकरी प्रकाश जाेजन, निरज पाटील, रविराज राजपूत आदींनी केला.