मान्सूनपूर्व कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:33 AM2021-04-27T04:33:07+5:302021-04-27T04:33:07+5:30
उस्मानाबाद : महावितरणतर्फे पावसाळ्यात वीजपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. सध्या वाशी तालुक्यात ...
उस्मानाबाद : महावितरणतर्फे पावसाळ्यात वीजपुरवठा करण्यामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व कामांना सुरूवात करण्यात आली आहे. सध्या वाशी तालुक्यात या कामावर चांगला जोर देण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अभियान सुरू
(फोटो : लोमटे)
काजळा : येथे कोरोनामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी ग्राम कोरोना सुरक्षा समिती स्थापन करून लसीकरणाबाबत जनजागृती सुरू असून, ग्रामस्थांनी नियम पाळावेत, असे आवाहन सरपंच प्रवीण पाटील, ग्रामसेवक नितीन रणदिवे यांनी केले आहे.
गावठी दारू जप्त
तुळजापूर : काटी येथील अशोक विठ्ठल क्षीरसागर हे २४ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर पंधरा लीटर गावठी दारूसह तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला सापडले. हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईची मागणी
उमरगा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असून, अत्यावश्यक सेवाही सकाळी ११पर्यंतच सुरु ठेवल्या आहेत. असे असतानाही शहरात काही टपरीधारक चोरून व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.