गरोदर मातांना घेता येणार आज लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:37+5:302021-08-23T04:34:37+5:30

कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गरोदर महिलांना अद्यापपर्यंत ही लस घेता येत ...

Pregnant mothers can get the vaccine today | गरोदर मातांना घेता येणार आज लस

गरोदर मातांना घेता येणार आज लस

googlenewsNext

कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गरोदर महिलांना अद्यापपर्यंत ही लस घेता येत नव्हती. गरोदर मातांना कोरोना झाल्यास इतर महिलांपेक्षा गरोदर मातांमधील आजाराची तीव्रता अधिक असते, त्याचबरोबर गरोदर मातेसाेबतच तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही या आजारामुळे विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये कमी कालावधीत प्रसूती होणे, प्रि-एक्लामशिया, सिझेरियनची शक्यता वाढणे, अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता लागणे, मातामृत्यू तसेच नवजात बालक मृत्यू होणे अशा गुंतागुती निर्माण होण्याचा धोका उद्भवू शकतो. ज्या गरोदर मातांना मधुमेह, दमा, सिकलसेल आजार, हृदयविकार, किडनीचे आजार असल्यास त्यांच्यामध्ये वरील धोका होण्याचे प्रमाण कोविड- १९ आजारामुळे अधिक वाढते. यामुळे सर्व गरोदर मातांना कोविड-१९ प्रतिबंधक लस घेऊन त्यांना संरक्षित करण्याकरिता लस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात ९ जुलैपासून प्रधानमंत्री सुरक्षित अभियानाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालयात इतर आरोग्य सेवेंबरोबरच कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असेल. गरोदर मातांना स्वत:चे व होणाऱ्या बाळाचे आजारापासून संरक्षण व्हावे, यासाठी गराेदर मातांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Pregnant mothers can get the vaccine today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.