गर्भवती महिलेने चाचण्या करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:28+5:302021-06-25T04:23:28+5:30

गर्भधारणा झाल्यानंतर महिलांनी सोनोग्राफी तसेच आवश्यक त्या चाचण्या केल्याने बाळ कसे वाढत आहे व त्याबद्दल काय काळजी घ्यावी हे ...

A pregnant woman needs to be tested | गर्भवती महिलेने चाचण्या करणे गरजेचे

गर्भवती महिलेने चाचण्या करणे गरजेचे

googlenewsNext

गर्भधारणा झाल्यानंतर महिलांनी सोनोग्राफी तसेच आवश्यक त्या चाचण्या केल्याने बाळ कसे वाढत आहे व त्याबद्दल काय काळजी घ्यावी हे कळते. गर्भधारणा झाल्यानंतर आवश्यक त्या सर्व चाचण्या करून घेणे गरजेचे असते. गर्भवती महिलेने गरोदरपणात टीटीची दोन इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोनवेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी ही पाचव्या महिन्यात बाळामध्ये काही व्यंग आहे का, तपासण्यासाठी असते. तर दुसरी सोनोग्राफी आठव्या नवव्या महिन्यात करणे गरजेचे आहे. या सोनोग्राफीमध्ये बाळंतपण किंवा प्रसूती सामान्य राहील का शस्त्रक्रिया करावी लागणार याचे नियोजन करता येते.

चौकट.

चाचणी आवश्यक

गर्भधारणा झाल्यानंतर पाचव्या व नवव्या महिन्यात सोनोग्राफी चाचणी करून घ्यावी, तसेच एचआयव्ही, थायरॉईड, कावीळ, व्हीआरएल, रक्तदाब, लघवी, रक्तगट या तपासण्या गर्भवती महिलांनी करून घेणे आवश्यक आहे.

कोट..

जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना काळात सोनोग्राफी तसेच रक्त तपासणी सुरू आहे. मागील वर्षभरात ६ हजार १३६ प्रसूती झाल्या आहेत. यात ३ हजार ९०३ प्रसूती या नाॅर्मल झालेल्या आहेत.

डॉ. स्मिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक

जिल्हा स्त्री रुग्णालय

Web Title: A pregnant woman needs to be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.