महामुकाबल्याची तयारी, कारखान्यांचे सिलिंडर्स ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:31+5:302021-04-25T04:32:31+5:30

उस्मानाबाद : आगामी काळात कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून या महामारीच्या महामुकाबल्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे ...

Preparations for the confrontation, the cylinders of the factories in possession | महामुकाबल्याची तयारी, कारखान्यांचे सिलिंडर्स ताब्यात

महामुकाबल्याची तयारी, कारखान्यांचे सिलिंडर्स ताब्यात

googlenewsNext

उस्मानाबाद : आगामी काळात कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून या महामारीच्या महामुकाबल्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे ऑक्सिजन बेड वाढविले जात आहेत. तेव्हा ऑक्सिजन अन् पर्यायाने सिलिंडर्सही जास्तीचे लागणार आहेत. याअनुषंगाने महसूल विभागाने साखर कारखान्यांकडील सिलिंडर्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत चालली आहे. त्यातही आजार अंगावर काढून रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. परिणामी, त्यांना किमान ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासते. सध्या हे बेडही अपुरे ठरू लागले आहेत. याअनुषंगाने जिल्हा रुग्णालयासह काही रुग्णालये व कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेडची उपलब्धता केली जात आहे. दरम्यान, इकडे बेड वाढत असताना त्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध कसे करणार, हाही मोठा प्रश्न आहे. मात्र, तुटवडा लवकर संपेल या आशेवर पुढची तयारी सुरू झाली आहे. ऑक्सिजन साठा आला तरी त्याचे स्टोरेज कसे करणार, या प्रश्नाचे उत्तर शोधताना महसूल विभागाच्या दृष्टिपथात साखर कारखाने आले. साखर कारखान्यांकडे जंबो सिलिंडर्स असतात. याची माहिती मिळताच जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांकडे त्यांच्याकडे असलेल्या सिलिंडर्सबाबत चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्याकडील सिलिंडर्स ताब्यात घेऊन स्टोरेज वाढवितानाच वाढीव ऑक्सिजन बेडचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.

वाशी, रांजणी, हावरगावचे कारखाने पावले...

कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या जंबो सिलिंडर्सचा शोध घेत असताना कळंब व वाशी तालुक्यांतील काही कारखान्यांकडे ते उपलब्ध असल्याचे महसूलच्या लक्षात आले. यानंतर तातडीने संबंधित तहसीलदारांना सूचना करून ते ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. यानुसार शुक्रवारी रात्रीपर्यंत वाशी येथील भैरवनाथ शुगर्समधून ११, हावरगाव येथील डीडीएनएसएफए शुगर्समधून ७ व रांजणी येथील नॅचरल शुगर्समधून ४ सिलिंडर्स वैद्यकीय उपचारार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.

Web Title: Preparations for the confrontation, the cylinders of the factories in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.