फळभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, वांगी, शेवग्याचे दर चढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:24+5:302021-07-23T04:20:24+5:30
उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, ...
उस्मानाबाद : सततच्या पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी वांगी, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा महागलेलाच आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
सध्या बाजारात गवार ४० ते ५० रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, फ्लॉवर ३० ते ४० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, वांगी ६० ते ८० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे पालेभाज्यांना मागणी कमी आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू, चुका या भाज्यांची जुडी १० रुपयास विक्री होत आहे. हरभरा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मसूर डाळीचे दर स्थिर आहेत.
म्हणून भाजीपाला कडाडला
खरीप हंगामात शेतकऱ्यांचा पालेभाज्यांऐवजी सोयाबीन, मूग, उडीद ही पिके घेण्याकडे कल अधिक असतो. ज्या शेतकऱ्यांनी फळभाज्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्या भाजीपाल्याचे पावसाने नुकसान होते. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत काही फळभाज्यांचा तुडवडा निर्माण होतो. त्यामुळे दर वाढतात.
डाळीचे दर स्थिरच
गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊमुळे फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात केली होती
पालेभाज्या व फळभाज्यांचे क्षेत्र घटल्याने मागणीच्या तुलनेत बाजारात भाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले. परिणामी अनेकांनी डाळींना पसंती दिली. डाळींना मागणी वाढल्याने डाळींच्या दरातही मागील सहा महिन्यांपूर्वी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली हाेती. मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा स्वत होत्या. त्यामुळे डाळींचे दर स्थिर राहिले आहेत.
डाळींचे दर प्रतिकिलो
हरभरा ६० ते ७०
तूर ९० ते ९५
मूग ९२ ते ९७
उडीद ८८ ते ९५
मसूर ८० ते ८२
भाजीपाल्याचे भाव प्रतिकिलो
बटाटा २५
कांदा ३०
टोमॅटो १०
गवार ४०
भेंडी ४०
शेवगा ८०
वांगी ६०
फ्लॉवर ४०
पत्ताकोबी ३०
दोडका ३०
सर्वसामान्यांचे हाल
कोरोना संसर्गामुळे रोजगार नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच भाज्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे डाळी खरेदी करण्यावर भर दिला आहे.
अरुणा शिंदे, गृहिणी
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच दोन तीन महिन्यांच्या कालावधीत खाद्यतेलाचे व डाळींच्या दरातही वाढ होत असते. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कोमल वाघमारे, गृहिणी