भूजल पातळी वाढविण्याची हवी प्राथमिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:46+5:302021-07-10T04:22:46+5:30
उमरगा : जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात अत्यल्प पाऊस पडतो. जमिनीतील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ ...
उमरगा : जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात अत्यल्प पाऊस पडतो. जमिनीतील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ करण्याचे आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही भूजल पातळी वाढविण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे, असे मत वरिष्ठ भूवैज्ञानिक बी. एम. ठाकूर यांनी व्यक्त केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भूजल पुनर्भरण उपयोजना' या विषयावर ऑनलाइन सेमिनार ८ जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. एम. एस. कलशेट्टी, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, अमित जिरंगे, डॉ. मेघा शिंदे, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, प्रा. डी. व्ही. थोरे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. जी. एन. सोमवंशी, डॉ. पार्वती सावंत यांची प्रमुख उपस्थिती हाेती. ऑनलाइन सेमिनारसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर यांनी केले तर आभार डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी मानले.