येरवाडा जेलमधून फरार कैदी कवठ्यातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:29 AM2021-03-22T04:29:00+5:302021-03-22T04:29:00+5:30
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कवठा येथील दत्ता किसन गायकवाड हा खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची ...
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील कवठा येथील दत्ता किसन गायकवाड हा खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा येरवडा तुरुमगात भाेगत हाेता. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ राेजी ताे जेलमधून फरार झाला. या प्रकरणी त्याच्याविरूद्ध येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. यानंतर येरवडा पाेलिसांनी उस्मानाबाद पाेलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क केला. यानंतर स्थानिक पाेलिसांनी आपले खबरे सक्रिय केले. दरम्यान, दत्ता गायकवाड हा आपल्या कवठा या मूळ गावी आला असल्याची गाेपनीय खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन घाडगे, पाेलीस उपनिरीक्षक सदानंद भुजबळ, पाेहेकाॅ जगदाळे, ठाकूर, साळुंके, पाेलास नाईक शेळके आणि पाेलीस काॅन्स्टेबल सर्जे यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी त्यास जेरबंद केले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गायकवाडला पुणे पाेलिसांच्या ताब्यात दिले.