पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी लागला मार्गी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:54+5:302021-08-13T04:36:54+5:30
परंडा : शहरातील कुर्डूवाडी राज्य मार्गीवरील जुना जकात नाका परिसर पासून ते पल्ला गल्ली या परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ...
परंडा : शहरातील कुर्डूवाडी राज्य मार्गीवरील जुना जकात नाका परिसर पासून ते पल्ला गल्ली या परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या दशकापासून प्रलंबित होता. तो कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, या भागात नवीन जलवाहिनीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन कामाचा शुभारंभही गुरुवारी करण्यात आला.
कुर्डूवाडी जुना नाका परिसरापासून मंगळवार पेठ जवळच्या पल्ला गल्ली परिसरातील जलवाहिनी जीर्ण झाल्याने या भागातील रहिवाशांना पाणीप्रश्न भेडसावत होता. कुठे कमी दाबाने तर काही नळ फक्त दिखाव्यासाठी उरले होते. गेल्या दशकापासून पिण्याचा हा प्रश्न रेंगाळला होता. गेल्या आठवड्यात या भागातील नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची भेट घेऊन सदरील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. हा विषय गाभीर्याने घेत नगराध्यक्ष सौदागर यांनी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा व या भागातील कुटुंबांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नवीन जलवाहिनीच्या कामाला प्रशासकीच मंजुरी दिली. सदरील नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तन्वीर मुजावर, पाणीपुरवठा अधिकारी जलाल मुजावर, जाकीर मुजावर, अमजद मुजावर, जयंत शिंदे, संजय शिंदे, तानाजी बनसोडे, निजाम मुजावर, फाजलुदीन मुजावर, वायोजोदीन मुजावर, निजाम मुजावर, शब्बीर मुजावर, हाफिजोदीन काझी, दौलत तांबोळी, यासीन मुजावर, अझहर मुजावर, मुन्ना मुजावर, जावेद मुजावर, हुसेन पठाण, फयुंम मुजावर, अहमद शेख, सद्दाम पटेल, आरिफ दखनी, फारुख तांबोळी, ताजोदीन शेख, जम्मू शेख, जमील शहाबर्फिवाले, अब्दुल पठाण, सलीम पठाण आदी उपस्थित होते.