खड्डे बुजविण्याचे आश्वासन, आंदाेलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:22+5:302021-09-03T04:34:22+5:30
उमरगा तालुक्यातील मुरूम मोड ते आलूर जिल्हा सरहद्द या २९ किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी सुमारे ६६ काेटी ७२ लाख रुपये ...
उमरगा तालुक्यातील मुरूम मोड ते आलूर जिल्हा सरहद्द या २९ किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी सुमारे ६६ काेटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे; परंतु आजपावेताे कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून लहान-माेठे अपघात हाेत आहेत. दरम्यान, निधी मंजूर हाेऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी मुरूम-अक्कलकाेट रस्त्यावरील झाेपडपट्टीनजीक शिवसेनेच्यावतीने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात येणार हाेते. तसा इशाराही दिला हाेता. दरम्यान, आंदाेलनाचा इशारा देताच संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे मुरूम टाळून बुजविण्यात येतील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे नियाेजित आंदाेलन काही दिवसांपुरते मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेेना तालुकाध्यक्ष बाबूृराव शहापुरे यांनी दिली.