रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:45+5:302021-07-10T04:22:45+5:30

उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अपेक्षित गती येत नसल्याने गुरुवारी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबादेत बैठक ...

Proposal for railway land acquisition in four stages | रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या

googlenewsNext

उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, अपेक्षित गती येत नसल्याने गुरुवारी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबादेत बैठक घेतली. त्यात अधिकाऱ्यांना या मार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव ४ टप्प्यांत देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची, महसूल विभाग व उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची आढावा बैठक झाली. सोलापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गात उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील ४२ गावे येतात, तसेच हा रेल्वे मार्ग ८० किमी लांबीचा असून, पहिल्या टप्प्यात ० ते २० किलोमीटर अंतरातील रेल्वे लाइनचा प्रस्ताव रेल्वे विभागाच्या डिमार्केशन करणाऱ्या एजन्सीने मोजणी विभागास द्यावा, अशी सूचना करण्यात आली, तसेच ६० ते ८० किमी अंतरातील भूसंपादन प्रस्ताव जुलै, ० ते २० किमीचा भूसंपादन प्रस्ताव ऑगस्ट, ६० ते ४० किमीचा भूसंपादन प्रस्ताव सप्टेंबर व ४० ते २० किमीचा भूसंपादन प्रस्ताव हा ऑक्टोबर महिनाअखेर पर्यंत रेल्वे विभागाने महसूल विभागाकडे द्यावा, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय अरुण गायकवाड, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमटे, मध्यरेल्वेचे स.का.अभियंता राजनारायण भगवानदीन, उपमुख्य अभियंता पंकज धावारे, संग्राम देशमुख, तुलसीदास जमाले यांच्यासह रेल्वे विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेखचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Proposal for railway land acquisition in four stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.