संरक्षक भिंत ९ महिन्यांपूर्वी ढासळली, बांधकामास मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:26+5:302021-09-07T04:39:26+5:30

भूूम तालुक्यातील निसर्ग रम्य ठिकाण असलेल्या शिवखेडा येथे महादेवाचे मंदिर असल्याने येथे श्रावण महिण्यात भक्त मोठ्या संख्येने सोमवारी दर्शन ...

The protective wall collapsed 9 months ago, when is the moment for construction? | संरक्षक भिंत ९ महिन्यांपूर्वी ढासळली, बांधकामास मुहूर्त कधी?

संरक्षक भिंत ९ महिन्यांपूर्वी ढासळली, बांधकामास मुहूर्त कधी?

googlenewsNext

भूूम तालुक्यातील निसर्ग रम्य ठिकाण असलेल्या शिवखेडा येथे महादेवाचे मंदिर असल्याने येथे श्रावण महिण्यात भक्त मोठ्या संख्येने सोमवारी दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. मंदिराच्या शेजारी शहराला पाणीपुरवठा करणारा वंजारवाडी तलाव आहे. सध्या जाेरदार पाऊस पडत असल्याने तलावाचे पाणी मंदिराजवळ आले आहे. याच मंदिराची संरक्षक भिंत मागील नऊ महिन्यांपूर्वी पडली आहे. ही भिंत तातडीने बांधली जाईल, असे अपेक्षित हाेते. परंतु, याकडे काेणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे भाविकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. श्रावण महिन्यातील पहिल्या साेमवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत दर्शनासाठी तेथे गेले हाेते. त्यांनी सभापती भडके यांना हे काम तातडीने मार्गी लावण्याबाबत सांंगितले हाेते. परंतु, १ महिना लाेटला असतानाही काेणीही फिरकले नाही, असे पुजारी स्वामी यांनी सांगितले.

Web Title: The protective wall collapsed 9 months ago, when is the moment for construction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.