धनगरवाडीत समर्थकांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:32 AM2021-02-10T04:32:41+5:302021-02-10T04:32:41+5:30
(फोटो : दयानंद काळुंके ०९) अणदूर : तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलविरुद्ध भाजपा ...
(फोटो : दयानंद काळुंके ०९)
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलविरुद्ध भाजपा प्रणित पॅनल यांच्यात अटीतटीची लढत होऊन ग्रामविकास पॅनलने सर्व जागा ताब्यात घेतल्या. सोमवारी सरपंचपदी नागनाथ नामदेव घोडके यांची तर उपसरपंचपदी राम श्रीमंत कदम यांची निवड झाली आहे.
गावातील युवकांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. इतर गावांपेक्षा विकासाच्या बाबतीत धनगरवाडी हे गाव मागे असल्याने जनता त्रासून गेली होती. यामुळे गावातील युवकांनी एकत्र येत गावातील बुजुर्ग मंडळींच्या साथीने सत्तेत कायापालट केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर एक वर्षापासून याची तयारी युवकांनी सुरू केली होती. दरम्यान, सरपंचपदी नागनाथ नामदेव घोडके यांची तर उपसरपंचपदी राम श्रीमंत कदम यांची निवड झाल्यानंतर आतषबाजी, गुलालाची उधळण करीत सरपंच नागनाथ घोडके, उपसरपंच श्रीमंत कदम आणि नूतन सदस्य सुरेखा घोडके, सुवर्णा घोडके,जयश्री एडके, अनिल चव्हाण, वर्षा राठोड यांची मिरवणूक काढण्यात आली.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास पॅनलने हे यश संपादन केले. यासाठी माजी सरपंच बिरु दुधभाते, देवराव घोडके, मनोहर दुधभाते, सुभाष घोडके, नवनाथ दुधभाते, शिवाजी चव्हाण, गोविंद चव्हाण, ॲड. सुधाकर दुधभाते, नवनाथ दुधभाते, शामराव राठोड यांच्यासह धनगरवाडी, चव्हाणवाडी तांड्यावरील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.