गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:29 AM2021-03-22T04:29:11+5:302021-03-22T04:29:11+5:30
उस्मानाबाद : रविवारी भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल ...
उस्मानाबाद : रविवारी भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी जमा करुन देण्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे महाराष्ट्राचे गृह खाते बदनाम होत असल्याने गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘गृहमंत्री देशमुख राजीनामा द्या, गृहमंत्री हाय... हाय..., उद्धव ठाकरे सरकार हाय... हाय...’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, भाजप जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भा. ज. यु. मो. जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, बालाजी कोरे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, संतोष क्षीरसागर, गिरीश पानसरे, शीतल बेदमुथा, सुरज शेरकर, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, अक्षय भालेराव, श्रीराम मुंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.