जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:02+5:302021-02-17T04:39:02+5:30

मागणी-विनाअट महादेव कोळी जातीचे दाखले द्या उस्मानाबाद - कोळी समाजास महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० वर्षा पूर्वीच्या ...

Protests in front of the Collector's Office | जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन

googlenewsNext

मागणी-विनाअट महादेव कोळी जातीचे दाखले द्या

उस्मानाबाद - कोळी समाजास महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० वर्षा पूर्वीच्या पुराव्याची अट न लावता सरसकट जातीचे दाखले देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विकास संघ असोसिएशन जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव व केशेगाव ही दोन गावे १९४८ च्या हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात दि.२२ मे १९४८ रोजी रझाकार यांनी केलेल्या हल्ल्यात ही दोन्ही गावे संपूर्णपणे लुटून बेचिराख करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या गावातील व्यक्तींची घरे व ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय जळाल्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना शपथ पत्र दिलेले आहे. तसेच याबाबत स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश महाराष्ट्र मराठवाडा या ग्रंथात देखील पुरावे उपलब्ध असल्याचे त्या शपथपत्रात नमूद केले आहे. तर उस्मानाबाद गॅझेटमध्ये पान नंबर १९४ वर देखील महादेव कोळी हे बालाघाट मध्ये राहतात असा उल्लेख आहे. असे असतानाही महादेव काेळी जातीचे दाखले मिळत नाहीत. परिणामी समाज बांधवांना प्रचंड गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने विनअट दाखले द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी विकास संघ असोसिएशन जिल्हा शाखेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण घंटे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत घंटे, जिल्हा सचिव पंडित घंटे, कार्याध्यक्ष गंगाधर कोळी, गौरीशंकर कोळी, नागेंद्र जमादार, विजयकुमार घंटे, सारंग कोळी, सतिश कोळी, काशिनाथ कोळी, शंकर घंटे, रविराज कोळी, भालचंद्र कोळी, अमर कोळी आदी उपस्थित हाेते.

Web Title: Protests in front of the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.