उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी आता जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:18 PM2021-03-10T20:18:36+5:302021-03-10T20:20:31+5:30
A Janata curfew in Osmanabad district काेराेनाचा हा संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी १० मार्च राेजी स्वतंत्र आदेश काढून काही निर्बंध घातले आहेत.
उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले हाेते. परंतु, मागील काही दिवसांपासून काेराेनाच्या रूग्णसंख्येत भर पडू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी १० मार्च राेजी स्वतंत्र आदेश काढून काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार दर रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्याविरूद्ध काेविड अधिनियमान्वये कारवाई कली जाणार आहे.
काेराेना बाधितांच्या संख्येत भर पडू लागल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी काही बाबींवर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही दिवसागणिक हळू-हळू रूग्णांच्य संख्येत भर पडू लागली आहे. काेराेनाचा हा संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी १० मार्च राेजी स्वतंत्र आदेश काढून काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद असणार आहेत. साेबतच प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. या काळात सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहतील. तथापि रूग्णालयाशी संलग्न असेलेली औषधी दुकाने सुरू राहतील. त्याचप्रमाणे नगर परिषद, नगर पालिका तसेच नगर पंचायत हद्दीत बुधवारपासूनच रात्री ९ तेे पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधांचे पालन न करणार्यांविरूद्ध कठाेर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले आहेत.
असे आहेत निर्बंध :
- जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी बंद राहतील. तसेच धार्मिक विधीमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही.
- जीम, व्यायमशाळा, स्पाेर्टस काॅम्ल्पेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टॅंक हे ५० टक्के क्षमतेने वैयक्तिक सरावासाठी चालू ठेवण्यास परवानगी राहील. यासाठी सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे.
- जीम, व्यायमशाळा, स्पाेर्टस काॅम्ल्पेक्स, खेळाची मैदाने या ठिकाणी माेठ्या स्पर्धा आयाेजित करण्यास व प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार नाही.
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनाेरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व इतर सभा, संमेलने, उपाेषण, आंदाेलन, निदर्शने, माेर्चा काढण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई केली आहे.
- भाजीमंंडईत सामाजिक अंतराचे पालन हाेईल, या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे.
- १५ मार्च पासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हाॅल, लाॅन्सपुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.