लोटाबहाद्दरांना कान पकडण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:50+5:302020-12-23T04:27:50+5:30

(फोटो - गुणवंत जाधवर २२) उमरगा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, या ...

Punishment for holding Lot Bahadur's ears | लोटाबहाद्दरांना कान पकडण्याची शिक्षा

लोटाबहाद्दरांना कान पकडण्याची शिक्षा

googlenewsNext

(फोटो - गुणवंत जाधवर २२)

उमरगा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, या पथकाने तीन दिवसांत १७४ जणांवर कारवाई केली. यातील काहींना कान पकडण्याची शिक्षा देऊन समजही देण्यात आली.

उमरगा तालुक्यात गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे यांनी ३ गुड मॉर्निंग पथकांची स्थापना केली. यात तालुक्यातील तुरोरी, तलमोड गावात मंगळवारी पहाटे उघड्यावर शौचास जाणाऱ्या २० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या ३ पथकातील ३० कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत १७४ जणांना पकडले असून, त्यांना कॅमेऱ्यात कैद देखील केले आहे. पथकात गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे एन. एस. राठोड, एस. एम. शटगार, आस्थापना वरिष्ठ सहाय्यक एन. आर. घुमे, ग्रामसेवक एन. डी. श्रीगिरे, एस. एस. चव्हाण, ए. सी. राठोड, पी. एल. माले, जे. एस. गायकवाड यांचा समावेश होता.

Web Title: Punishment for holding Lot Bahadur's ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.